विद्या ने दिले ह्याला बिनतोड उत्तर | Vidya Balan Latest Update | Lokmat Latest News

2021-09-13 5

विद्या बालन सध्या तिची अपकमिंग फिल्म च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्तानेच विद्याने मीडियासोबत बातचीत केली, तेव्हा एका रिपोर्टरने अचानक तिला तिच्या वजनाबद्दल छेडले. हे विद्याला आवडले नाही आणि तिने तिथेच त्या रिपोर्टला बिनतोड उत्तर दिले.रिपोर्टरने विद्याला विचारले, आम्ही आतापर्यंत तुमच्या जेवढ्या फिल्म पाहिल्या त्या बहुतेक महिला प्रधान होत्या. यापुढेही तुम्ही महिला प्रधान चित्रपटांमध्ये दिसणार की वजन कमी करण्याचाही काही विचार आहे
ह्या वर विद्या म्हणाली महिला प्रधान चित्रपटांचा आणि वेट लॉस करण्याचे आपसात काय कनेक्शन आहे? त्यावर रिपोर्टर म्हणाला, की मी तुम्हाला ग्लॅमरस रोलबद्दल विचारत होतो.
विद्याने रिपोर्टरच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, 'सध्या मी जे काम करत आहे त्यात मला खूप आनंद मिळत आहे. तुम्ही तुमचा दृष्टीकोण बदलला तर थोडे बरे होईल

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews